Published On : Wed, Dec 26th, 2018

शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबीराने संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

कन्हान : – शिवनगर कन्हान येथे मोफत शस्त्र क्रिया व आरोग्य तपासणी शिबीराने संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . शिवमंदिर, शिवनगर कन्हान येथे कृणाल हॉस्पिटल नागपूर व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व्दारे मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबीराची सुरूवात मा शंकरराव चहांदे नगराध्यक्ष नगरपरिषद कन्हान-पिपरी , मा मनोहर पाठक उपाध्यक्ष न प कन्हान -पिपरी, मा राजेंद्र शेंदरे नगरसेवक, सुश्री महानंदाताई, भगवान भुसारी आदी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून करण्यात आली .

याप्रसंगी नगरसेवक मनोज कुरडकर, नगरसेविका सुषमा चोपकर, लक्ष्मी लाडेकर, संगिता खोब्रागडे , राखी परते, स्वाती पाठक प्रामुख्याने उपस्थित होते . शिबीरात हृदयरोग, अँन्जीयोप्लास्टी , बायपास, हृदयाला छिद्र, मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार किडनी स्टोन (पथरी) वेरीकोज वेन्स, डी व्ही टी आदी आजाराच्या ३८० रूग्णाची तपासणी करून ४८ रूग्णाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .

तसेच २४० नागरिकांची ईसीजी, बी पी, सुगर तपासणी करण्यात आली. शिबीरास कुणाल हॉस्पिटल नागपुर चे डॉ चंदन भोयर, रणजित प्रजापती सह चमुनी विशेष सहकार्य केले . शिबीराच्या यशस्वीते करिता पुरूषोत्तम बेले , बाबा नांदुरकर, विजय मोखरकर, संजय शेंदरे , किशोर नांदुरकर, सुरेश मुरकुटे , विजय नांदुरकर, तुषार मुरकुटे , गोलु नांदुरकर, संजय चहांदे , भुषन लंगडे , योगेश धावडे सह शिवनगर वासीयानी सहकार्य केले .