Published On : Thu, Nov 8th, 2018

शेतकारी आत्महत्या ग्रस्त परिवारास दिवाळी भेट वस्तु देवून दिवाळी साजरी

Advertisement

कन्हान : – देशात शेतकऱ्यांची दशा, परिस्थिती कोणा पासून लपलेली नसुन राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात शेतकारी नापिकी,दुष्काळ, महागाई, कर्जाबाजारी व इतर कारणामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहे.

जरी शेतकऱ्यांनी ज्या काही कारणामुळे आत्महत्या केली असेल ते कारण योग्य होते किंवा अयोग्य होते त्या भांगडित न पडता.त्या शेतकरी निर्दोष परिवाराच्या सुखा-दु:खात सहभागी व्हावे आणि त्याला हिम्मत यावी या हेतु ने दिवाळी निमित्त संजय सत्येकार यांनी आपले चार सोबती घेऊन गोड वस्तु, साड़ी कपङे व इतर वस्तु भेट दिल्या.

त्या शेतकऱ्याचा गुन्हा इतकाच की त्यांनी इतरांचे पोट भरण्या साठी दुनियातला सर्वात रिस्की(खतरनाक) व्यवसाय केला.ज्याला शेती म्हणतात हाच त्याचा गुन्हा.परंतु याची सजा अख (संपूर्ण) आयुष्य शेतकऱ्याचे कुटुंब भोगनार. जरी कोणी काही ही म्हटले आणि कोणी किती ही ज्ञान दिले किती ही आर्थिक मद्दत केली .तरी मुलाना आपले वडील ,बायको ला नवरा ,आई बापाला आपका मुलगा कधी नाही दिसणार .

आपण ही याच समाजातील एक भाग अाहो , आपलीही काही जवाबदारी आहे याच गोष्टीचा भान व जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे . शेतकारी नेते संजय सत्येकार , हाईकोर्ट च्या वरिष्ठ वकील राजकुमारी रॉय, राजू दुनेदार, गोंडेगाव चे सरपंच नितेश राऊत, निमखेडा चे सरपंच छायाताई सोनेकर, विट्ठलराव ठाकुर, अमोल देउलकर, लाहनुजी वकलकर, गोविंदराव वाहने, नागोराव आकरे, अशोक चरडे, संजय ठाकरे, सुभाष डोकरीमारे , राजू धोटे , अरुण शेंडे , नितिन रावेकर , शैलेश ढोरे, नीलेश रावेकर, गुड्डू चौधरी, मनोज गिरी, सुरेश गिरी, भगवानदास यादव, राजु गूडधे, यांचा पुढाकार व सहकराने वराडा , गवना , गोंडेगाव, निमखेडा , बोरडा, केरडी येथील आत्महत्या ग्रस्त कुटुंब व नैसर्गिक आपत्तीने जनावरांचा मुत्यु झाला अश्या दु:खी कुटुंबाच्या घरी पोहचुन त्या परिवारास गोड वस्तु , साड़ी कपङे व इतर वस्तु भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली . या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन या आगळयावेगळया उपक्रमाचे आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे .