Published On : Mon, Aug 19th, 2019

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचा लॉटरी सोडत सोहळा

Advertisement

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार, दिनांक १८/०८/२०१९ रोजी नागपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचा लॉटरी सोडत सोहळा आयोजित करण्यात आला होता. नॉर्थ अंबाझरी मार्गवरील धरमपेठ सायंस कॉलेजच्या बाजूला नासुप्र’च्या नैवेधम (हायलँड ग्लोरी) सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय परिवहन श्री. मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते पीएमवाय (प्रधानमंत्री आवास योजना) योजनेच्या लॉटरी सोडत प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. लॉटरी सोडत सोहळ्याचा संपूर्ण निकाल उद्या सोमवार, दिनांक १९/०८/२०१९ रोजी https://pmay.nitnagpur.org संकेत स्थळालावर जाहीर करण्यात येणार आहे.

लॉटरी सोडत सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व शहराचे महापौर श्रीमती नंदा जिचकार विशेष अथिती म्हणून तर खाजदार श्री. विकास महात्मे, आमदार श्री. सुधाकर देशमुख, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. सुधाकर कोहळे, आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. मिलिंद माने, नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा नासुप्र सभापती श्रीमती शीतल तेली-उगले व अपर आयुक्त श्री. हेमंत पवार तसेच इतर प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते.

Gold Rate
14 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उल्लेखनीय आहे कि, नामप्रविप्रा’द्वारे पोस्ट लॉटरी’च्या निविदा आमंत्रित करण्यात आल्या होत्या. लाभार्थ्यांचे अर्ज व सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी संगणीकृत https://pmay.nitnagpur.orgयावर अर्ज मागविण्यात आले होते. लॉटरी सोडत सोहळ्यानंतर काही संबंधित पत्र व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी पुढील २० ते २५ दिवस नामप्रविप्रा व नासुप्र’च्या कार्यालयात संपर्क करू नये. तथापी अधिक माहितीसाठी नामप्रविप्रा’च्या https://pmay.nitnagpur.org या संकेत स्थळावर (वेबसाईट) भेट द्यावी.*

या संकेत स्थळावर लाभार्थ्यांनी प्रथम View result यावर क्लिक करून यानंतर Application no द्यावा. नंतर लॉटरीचा संपूर्ण निकाल संकेत स्थळावर दिसेल. लाभार्थ्यांना हा निकाल पीडीएफ फॉर्मेट मध्ये डाऊनलोड करता येणार आहे. तसेच यासंदर्भात महत्वाची माहिती द्यावयाची असल्यास सदर माहिती लाभार्थ्यांना नोंदणीकृत भ्रमणध्वनी वरून एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल.

नामप्रविप्रा/नासुप्र द्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकूण ४३४५ घरकुले तयार करण्यात आली आहे. कंपाउंड वॉल, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तूंचे दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यकता असल्यास स्वतंत्र मल निस्सारण व्यवस्था, पावसाळी पाणी वाहीका, रेन वोटर हार्वेस्टिंग, पार्किंग, मीटर रम, बाह्य विद्युतीकरण, सार्वजानिक सुविधेकरता सौर ऊर्जा संच, सौर उर्जेवर चालणारी पथदिवे इत्यादी सोयी सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून यापैकी काही अंतिम टप्प्यात आहे.

Advertisement
Advertisement