Published On : Fri, Sep 6th, 2019

श्री.नरेंद्र तिडके महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Advertisement

रामटेक : रामटेक येथील श्री नरेंद्र महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन कार्यक्रमाचे तसेच शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे या होत्या.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू देऊन प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे,प्रा. सुनील कठाणे,प्रा. नरेश आंबीलकर, प्रा.श्रीकांत भोवते, प्रा अमरीश ठाकरे, नितीन घमंडी, प्रा उमेश घोनमोडे, जगदीश गुजरकर यांचा सत्कार केला. यावेळी पुनम रामटेके, कुंदन गजभिये,लक्ष्मी दमाहे, दिकेश भोयर, कौसल बांधे,नेहा भोसकर यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे यांनी आईवडील हे आपले पहिले गुरु असल्याचे सांगितले, शिक्षक हे ज्ञानदाते असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडणीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो,गुरुचा आदर करणारा श्रेष्ठ पदाला पोहोचतो असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन किरण मेश्राम हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी नेहा भोस्कर हिने केले .

स्वयंशासन कार्यक्रमात प्राचार्यांची भूमिका रोशनी बमनोटे हिने बजावली .याप्रसंगी सीमा घरजाळे, आचल शिवणे,अजय अजय मंद्रेले ,आचल सारंगपूरे, दिगेश भोयर,कुंदन गजभिये,किरण मेश्राम, सुजाता पाटील,शिवशंकर डहारे,ॠतिका कवरे, होमिका कोयपरे,अश्विनी ठाकरे,कार्तिक शेंडे, अमोल टेकाम, अंजली हिरापुरे,पुनम रामटेके,निखिल गोल्हर,अश्विनी ब्राह्मणकर, शिवानी कावळे,पूजा महाजन पपिश नागरीकर,यांनी अध्यापनाचे कार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर दमाहे,आकाश मसरके, मयुरी देशमुख,संचिता आकरे, करिष्मा महल्ले, सुकन्या फुलबांधे, अशोक कुचेकर ,नागो नाटकर,मनोहर बिसमोगरे यांनी परिश्रम घेतले.