Published On : Wed, Aug 10th, 2022

राष्ट्रगीताने क्रांती दिन साजरा

Advertisement

बेला : लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 9 ऑगस्ट क्रांती दिनाला राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्यानिमित्ताने स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाले.

इंग्रजांना त्यावेळी 9 ऑगस्टला ‘ भारत छोडो व चले जाव ‘चा आदेश भारतीयांनी दिला होता. राष्ट्रगीत गायन कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य रवींद्र वानखेडे, उपमुख्याध्यापक प्रा. सुनील मुलेवार, पर्यवेक्षक मिलिंद शाव ,राजू तळवेकर, नितीन पुरी, सुरेंद्र तळवेकर ,लक्ष्मण खोडके, प्रा. मोहन नगराळे, आशिष देशमुख ,गणेश लांबट ,ज्ञानेश्वर महाले, उत्तरा चीकराम, आरती मुलेवार, प्रा .माधवी रणनवरे ,प्रशांत भोंडगे, ओमप्रकाश राठोड, हेमलता बापट ,अनिकेत पवार, वैशाली नाईकवाडे ,पल्लवी गायकवाड, अरविंद भडे , लिपिक नथू कतारे व सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.