Published On : Thu, Jun 24th, 2021

आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Advertisement

भंडारा:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 जून 2021 रोजी विधी सेवा प्राधिकरण भंडारा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक योगतज्ञ ज्ञानोबा बोडके हे होते. योग ही प्राचीन विद्या आहे. मन व शरीर याचे एकत्रीकरण म्हणजे योग. आपल्या देशात सुमारे साडेपाच हजार वर्षापुर्वी महर्षी हिरण्यगर्भ यांनी योगाची सुरूवात केली. परंतू त्याकाळी लेखनाची व्यवस्था नसल्यामुळे योगाचा प्रचार-प्रसार झाला नाही.

त्यानंतर अडीच हजार वर्षांपुर्वी महर्षी पतंजली यांनी प्राचीन साहित्यातून प्रेरणा घेऊन अष्टांग योग शास्त्राचे मौलिक लिखाण पतंजली योग शास्त्र या ग्रंथाव्दारे केले. अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगाची शास्त्रशुध्द पध्दतीने मांडणी केली. म्हणूनच महर्षी पतंजलींना आधुनिक योगाचे जनक जनक संबोधले जाते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायम, सुर्यनमस्कार, मण्डूकासन, शलभासन, शिर्षासन, भूजंगासन, सर्वांगासन असे विविध योगासने प्रात्याक्षिक करुन दाखविले.

सदर कार्यक्रमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस.खुणे, कौंटूबिक न्यायालय न्यायाधीश श्रीमती अनिता शर्मा, दिवाणी न्यायाधीश एम. ए. कोठारी, सह दिवाणी न्यायाधीश ए. के. आवारी, दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. एस.भोसले, सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. पी. भोसले, सह दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. ए. पटले, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती चेतना नेवारे, तसेच न्यायालयातील प्रबंधक, व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा एस. पी. भोसले यांनी मानले.