Published On : Mon, Jun 21st, 2021

प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Advertisement

नागपूर : हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक ३४ येथील मानेवाडा दक्षिण नागपूर अध्यापक नगर मैदान येथे तसेच स्वराज नगर उद्यान येथे राणी झाशी योगा व भजन मंडळाच्या वतीने योगदिनानिमित्त विविध योगासनांचे धडे देण्यात आले.

मनपाचे स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती व प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, भाजपा नागपूर शहर उपाध्यक्ष संजय ठाकरे, नगरसेविका मंगला खेकरे, प्रभाग वार्ड अध्यक्ष राहुल यावलकर भाजप वॉर्ड अध्यक्ष, महामंत्री, निरीक्षक, पदाधिकारी कार्यकर्ते, महिला मंडळ अध्यक्ष दोन्ही स्थळी उपस्थित होते.

Advertisement

तसेच स्वराज नगर उद्यान येथे योग दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपन करण्यात आले. यासोबतच स्थानिक महिलांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग मंडळाच्या महिलांनी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement