Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या सीबीएसई शाळेसाठी प्रस्ताव पाठवा

मनपाच्या शिक्षण समितीची विशेष बैठकीत सभापती संतोषदेवी लढ्ढा यांचे निर्देश
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षण विशेष समितीची आज (ता.६) सोमवारी समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा अध्यक्षतेखाली समिती कक्षात मनपाच्या शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. यासोबतच मनपा शाळा सीबीएसई करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी दिले.

बैठकीत शिक्षण विशेष समिती सदस्य श्री. राम कुंभलकर, श्रीमती वैशाली उदापूरकर, श्री. सय्यद मुस्कान सय्यद इरफान, मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना महाजन, उपशिक्षणअधिकारी श्री सुभाष उपासे ,श्रीमती सीमा खोब्रागडे, शाळा निरीक्षक श्री.प्रशांत टेंभुर्ण , श्रीमती अंजुम आरा, श्रीमती शगुफ्ता परवीन, श्री विजय सोनी ,समग्र शिक्षा प्र.सहायक कार्यक्रम अधिकारी श्रीमती कविता शेख, श्री. विनय बगले यांच्यासह इतर उपस्थित होते.

यावेळी शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी शिक्षक भरतीच्या संदर्भातील विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी २७ जून पासून ९२ कंत्राटी शिक्षकांची भरती पद्धतीने रुजू झाले आहे. लवकरच उर्वरित कंत्राटी भरती करण्यात यावी, मनपाच्या सर्व शाळांमध्ये पुस्तके, गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचेही निर्देश सभापती यांनी दिले. यासोबतच पी एम श्री संजय नगर येथील शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिली.

बालवाडी आणि प्राथमिक शाळेसाठी हस्तकला वर्गासाठी टिल्टेड शीट आणि रंगरंगोटी साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, मनपाच्या २१ शाळांमध्ये सर्व शाळा समांतर दिसायला प्रेरणादायी भित्तीचित्र व रंगरंगोटी करण्यात यावे, प्रार्थनेच्या वेळी सर्व मनपा शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायले जावे, शिक्षणोत्सव मध्ये पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात यावी, सर्वात जास्त पाढे पाठ असणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले देण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Advertisement

तसेच महानगरपालिका बालवाडी शाळांचे नामकरण ‘बाल गोकुलम’ असे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली, सेमी-इंग्रजीच्या २१ शाळांचे नूतनीकरण करून त्यांना पूर्णतः स्मार्ट क्लासरूम, आधुनिक प्रयोगशाळा (लॅब), संगणक सुविधा आणि इतर आधुनिक शैक्षणिक संसाधनांनी सज्ज करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.