Published On : Sat, Apr 24th, 2021

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

Advertisement

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानासह काटोल येथील व अन्य दहा ठिकाणी सीबीआयच्या पथकांकडून शनिवारी सकाळी चौकशी सुरू करण्यात आली आहे. देशमुख कुटुंबीयांसह आत मध्येच असल्याची माहिती आहे. मात्र अधिकृत कोणतीही माहिती आतापर्यंत बाहेर आलेली नाही.

स्थानिक पोलिसांना सीबीआयकडून साधी सूचनाही नाही. त्यामुळे आतापर्यंत देशमुख यांचे निवास स्थान ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते ते सिताबर्डी पोलीस अनभिज्ञ होते. आता मात्र बंदोबस्ताच्या संबंधाने सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पथक देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. आयजी आणि एडिजी दर्जा चे तीन वरिष्ठ अधिकारी देशमुख यांच्या बंगल्यात चौकशी करीत असून दुपारपर्यंत देशमुख यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकाला ही ताब्यात घेतले जाण्याची चर्चा आहे.सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement