Published On : Wed, Apr 7th, 2021

घाटरोहणा येथे चोरीचा कोळसा ट्रक पकडला

– आरोपी अटक करून ट्रक,१० टन कोळसा सह साडेसात लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त

कन्हान : – पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत घाटरोहणा शिवारात गोंडेगाव खुली खदान चा कोळसा चोरी करून ट्रक मध्ये भरून नेताना कन्हान पोलीसानी सापळा रचुन शिताफितीने पकडुन आरोपी ताब्यातील ट्रक, चोरीचा १० टन कोळसा असा साडे सात लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरूध्द गुन्हयान्वये कारवाई करण्यात आली.

कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की, गोंडेगाव खुली कोळसा खदान चा चोरीचा कोळसा ट्रक मध्ये भरून नेत असल्याच्या गोपनिय माहीतीची कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर (परी.पो.उप अधिक्षक ) हयांनी सहानिशा करून स्वत: व सपोनि अमितकुमार आत्राम व पोलीस ताफ्यासह सोमवार (दि.६) ला दुपारी २.३० वाजता च्या सुमारास गोंडेगाव खदान सुरक्षा गार्ड ईन्चार्जओम प्रकाश पाल यांना माहीती देऊन पोलीस व सुरक्षा गार्ड हयानी सापळा रचुन शिताफीतीने घाटरोहणा शिवारा तील एचओई डम्पींगच्या मागे ट्रक मध्ये चोरीचा१०टन कोळसा भरून नेताना भैयालाल सुर्यवंशी ला रंगेहाथ पकडुन त्यास विचारपुस केली असता कुंदन तिजारे रा. कांद्री यांच्या सांगण्यावरून नेत असल्याचे सांगित ल्याने वेकोलि सुरक्षा गार्ड मेहुल प्रभाकर लेंडे वय २३ वर्ष रा बहादुरा नागपुर यांचे फिर्यादी वरून अप क्र १०६/२१ कलम ३७९, १०९ भादंवी नुसार आरोपी ट्रक चालक भैयालाल बच्चा सुर्यवंशी वय २६ वर्ष रा. वार्ड क्र ४ वलनी, खापरखेडा, व कुंदन तिजारे रा.कांद्री यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र एम एच ३४ एम ७४११ किंमत ७ लाख रूपये चोरीचा १० टन कोळसा किंमत ५० हजार रूपये असा एकुण साडे सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली असुन पुढील तपास करित आहे. ही कार्यवाही नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधिक्षक राहुल माकणी कर, पोलीस उपविभागीय अधिकारी कामठी मुख्तार बागवान यांचे मार्गदर्शनात परिवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार मा. सुजितकुमार क्षीरसागर , सपोनि अमितकुमार आत्राम, नापोशि कुणाल पारधी, पोशि शरद गिते, सुधीर चव्हाण, संजय बरोदिया, मंगेश सोनटक्के, जितेंद्र गावंडे सह पोलीस कर्मचा-यांनी कामगीरी यशस्वीरित्या बजावली.

– कमल यादव