Published On : Sun, May 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील ‘नेटफ्लिस अँड चील कॅफे’ वर पोलिसांची धाड; हुक्का पार्लरचा भांडाफोड

Advertisement

नागपूर : शहर पोलिसांच्या “ऑपरेशन थंडर” अंतर्गत नागपुरातील ‘Netflix and Chill Café’ येथे उशिरा रात्री छापा टाकून अवैध हुक्का पार्लरचा भांडाफोड करण्यात आला. ९ आणि १० मेच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून, शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरात तंबाखूजन्य हुक्का पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान कॅफेमध्ये सोहेल खान फिरोज खान (वय २२), एक वेटर आणि १९ ग्राहक उपस्थित आढळून आले. तपासादरम्यान ग्राहकांना आरोग्यास घातक ठरणारे तंबाखूयुक्त हुक्का पदार्थ पुरवले जात असल्याचे समोर आले. तसेच कॅफेमध्ये हुक्का सेवनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचेही पोलिसांना आढळले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छाप्यात पोलिसांनी हुक्का पॉट, विविध हुक्का फ्लेवर्स, धूम्रपानासाठी वापरले जाणारे साहित्य, फ्रिज, फ्रीझर, टेबल-खुर्च्या आदी साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८२ हजार ९९५ रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा (COTPA) २००३, महाराष्ट्र पोलिस कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, शहरातील बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि तत्सम व्यवसायांवर येत्या काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges