नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक १२ जुलै रोजी होणार आहे. निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपचे सात, शिंदेचे चार आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार मंत्रिमंडळात होऊ शकतात.
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसांमध्ये होणाची चिन्ह दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकीला चार महिने राहिलेले असताना रिक्त असलेली १४ मंत्रिपदे भरण्याच्या हालचालींना वेग आला आहेत. राज्याचे पावसाली अधिवेशन १२ जुलै रोजी संपणार आहे.
त्यानंतर दोन दिवस भाजपच्या प्रदेश कार्य समितीची पुणे येथे बैठक पार पडणार आहे. त्यानंतर विस्तार होईल,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात मंत्रीपदासाठी काही नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना मोठे स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे, परिणय फुके या नेत्यांना मंत्री केले जाऊ शकते. यापैकी अमरावती येथील रवी राणा यांनाही लॉटरी मिळू शकते. शिवसेनेच्या भावना गवळी यांच्याही नावाची चर्चा आहे.