Advertisement
नागपूर – महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
आज आझाद मैदानावर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यानंतर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यात राष्ट्रवादीचे 8 नेते, शिवसेना शिंदे गटातील 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. यानुसार फडणवीसांच्या नवीन मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह ३३ जणांचा समावेश असेल, अशी चर्चा सुरु आहे.