नागपूर : बर्डीतून हिंगण्याकडे जाणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाल्याची घटना घडली आहे. वांडोंगरी-सुतगिरणी काठावरील पेट्रोल पंपासमोर सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, काल स्टार बस क्रमांक MH31FC7159 ही नागपूरहून हिंगणाकडे जात होती. वांडोंगरी परिसरातील पेट्रोल पंपासमोर केबल टाकण्यासाठी नाला खोदण्यात आल्याने एकेरी वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे पाऊस पडत होता. बसचालक राजू सुखराम जामानिक, रा.चंदन नगर नागपूर यांच्या वेळीच हे लक्षात न आल्याने ते त्या लेनमध्ये गेले. त्यांनी वेळीच बस दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र अपघात होऊन बस पलटली. चालक राजू व कंडक्टर किरकोळ जखमी झाले.
दरम्यान हिंगणा नाका ते वानाडोंगरी या मार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असूनही ते पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या कडेला भूमिगत केबल टाकण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या.त्यामुळे याठिकाणी दिवसेंदिवस अपघाताच्या घटना घडत असतात.मात्र याकडे प्रशासनाने दुर्लश केल्याचे दिसते.