Advertisement
नागपूर : नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बसचा टायर फुटून ती उलटली आणि बसने अचानक पेट घेतला.या आगीत होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला.
Advertisement