
या पुलाखाली असलेल्या भंगार कचऱ्यातून कामाच्या वस्तू गोळा करणाऱ्यांची येथे नेहमीच वर्दळ असते. त्यातील कोणीतरी या कचऱ्यातील पेंटचे डब्बे पेटवून दिले. ही आग पाहता पाहता वाढली आणि तिने वरून चाललेल्या हायटेन्शन केबलला आपल्या विळख्यात ओढले. पुलाखालून मोठा धूर निघत असल्याचे पाहून काही नागरिकांनी जाऊन पाहिले असता त्यांना केबल जळत असल्याचे दिसले.
त्यांनी तात्काळ संबंधित कार्यालयाला कळवले मात्र तोपर्यंत ती केबल बरीच जळून गेली होती. या पुलाजवळच मोठे हॉस्पीटल व एक हॉटेल आहे. तसेच हा मोठा वर्दळीचा भाग असल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता टळल्याची नागरिकांत चर्चा होती.
			








			
			