Advertisement
नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेचा छडा लावत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शेख सुलतान शेख मोहम्मद (वय २३, रा. गोविंद गंज, उपळवाडी, कामठी रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून Asus Vivobook कंपनीचा लॅपटॉप व काळ्या रंगाची बॅग असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीसाठी त्याला सदर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईची नोंद सिम्बा ॲपमध्ये करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी दिली.