
नागपूर – शहरातील सक्करदरा भागात चंद्रकांत आंबुळकर यांच्या घरातून १५ ते १७ डिसेंबर दरम्यान चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं-चांदी, महागडे मोबाईल आणि दुचाकी चोरी केली. घरफोडी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या सखोल तपासातून अमोल चाफेकर आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून पांढऱ्या रंगाचा iPhone 16, हिरो होन्डा स्प्लेंडर दुचाकी, सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ८.५२ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे. दोघांवर पूर्वी देखील मालमत्तेचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांचे मार्गदर्शनाखाली घरफोडी विरोधी पथकाच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे.
शहरवासीयांनी घरांची सुरक्षा अधिक बळकट करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Advertisement








