Published On : Tue, Nov 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बंटी शेळके यांचा काँग्रेस कार्यालयात गेल्याचा व्हिडीओ व्हायरल !

Advertisement

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यात नागपुरात आश्चर्यचकित घटना समोर आली. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बंटी शेळके हे पळत पळत भाजपा कार्यालयात घुसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. स्वतः शेळके यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला.

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंटी शेळके आणि भाजपाचे प्रवीण दटके यांच्यात थेट लढत होत आहे. काल सायंकाळी बंटी शेळके प्रचार करत असताना ते अचानक भाजपाच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले.त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करत त्यांना मिठ्या मारल्या.ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशीर्वाद घेतले आणि काही मिनिटांत ते तिथून आपल्या प्रचारासाठी निघून गेले.बंटी शेळके यांच्या अचानक केलेल्या कृतीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बंटी शेळके यांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेयर केल्यानंतर त्याला एक कॅप्शनही दिले. माझी लढाई कुणा व्यक्तीबरोबर नाही तर विचारांशी आहे. फक्त नागपूर मध्य नाही तर संपूर्ण नागपूर शहरातील कोणताही व्यक्ती असो, तो कोणत्याही पक्षाचा किंवा धर्माचा असो, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा संकल्प आहे की, मी प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध राहू, असे बंटी शेळके कॅप्शनमध्ये म्हणाले आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement