बुलढाणा। रामनामाचा प्रसार अन् प्रचार करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज माकोडी यांच्या वाढदिवसाच्या तिथीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही राम उपासक मंडळाच्या वतीने बुलडाणा ते माकोडी पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे़.
गुरूवार दि 23 जुलै रोजी सकाळी सात वाजता बुलढाणा येथील गणेश नगर स्थित मलकापूर रोडवरील साईराम मंदिर येथून या पायी वारीला सुरूवात होणार आहे़ राजूर घाट, वाघजाळ फाटा, मोताळा मार्गे डिडोळा फाटा येथे 23 जुलै ला मुक्काम़ त्यानंतर 24 जुलै ला सकाळी तेथून प्रस्थान शेलापूर येथे दुपारी अकोला, खामगांव, नांदुरा, जळगाव जामोद व निरपूर या ठिकाणावरून येणाऱ्या वारकऱ्यांसोबत तळणी मार्गे सायंकाळ पर्यंत श्री़ क्षेत्र माकोडी येथे पायी वारीतील सदस्य मुक्कामी पोहचतील़ 25 जुलै रोजी समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांना पायी वारकरी उपस्थित राहतील़.
या पायी वारीत सहभागी होणाऱ्या ईच्छूकांनी सुरेश सदावर्ते, गजानन निर्मळे, साहेबराव राऊत, प्रशांत पवार, तरमळे, नागरे, रिंढे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़.