Published On : Sat, Jun 27th, 2015

बुलढाणा अर्बन पोहचली जागतिक स्तरावर

 

  • जागतिक अर्थकारणामध्ये बुलढाणा अर्बनची मोठी भूमिका
  • सहकारातील फोर पिलर सिस्टिममुळे महत्वपूर्ण संधी
  • बारा हजारांचे भांडवल पोहोचले साडेचार हजार कोटीवर
  • आर्थिक शिस्तीचा गौरव

Buldana -Dr. Sukesh Zanwar
बुलढाणा।
जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेविधीप्रमाणेच युनो अंतर्गत कार्यरत असलेल्या सहकार क्षेत्रातील इंटरनॅशनल को-आॅपरेटीव्ह अलायन्सचे सदस्यत्व बुलढाणा अर्बन पतसंस्थेस मिळाले आहे. भारतातून असे सदस्य मिळणारी बुलडाण अर्बन ही तिसरीच संस्था आहे. दरम्यान, बुलढाणा अर्बन पतसंस्थेस हे सदस्यत्व मिळाल्याने सहकार क्षेत्रांतर्गत जागतिक स्तरावर निती आणि निधी निर्धारणामध्ये बुलढाणा अर्बनच्या मताला एक मोठे अधिष्ठान मिळणार आहे.

नुकतेच आंतरराष्ट्रीय को-आॅपरेटीव्ह अलायन्सचे हे सदस्यत्व बुलढाणा अर्बन पतसंस्थेस मिळाले आहे. युनोशी संलग्न असलेले हे अलायन्स सहकार क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेशी जगातील 94 देशांमधील 274 संस्था जोडल्या गेल्या आहेत. बहुतांश फेडरेशनचा समावेश असून, जगातील 30 प्राथमिक को-आॅपरेटीव्ह सोसायटयाही संलग्न आहेत. मात्र, भारतातून ईफको आणि क्रिपको या दोन संस्थासह बुलढाणा अर्बनचा समावेश करण्यात आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात केवळ ईफको व क्रिपकोच ही किमया करू शकले होते. मात्र, 29 वर्षापूर्वी 12 हजार रूपये भांडवल आणि 72 सदस्यांपासून सुरूवात करणाऱ्या बुलढाणा अर्बनने सोडचार हजार कोटींच्या ठेवीची उपलब्धता गाठता आता थेट जागतिक स्तरावर सहकार क्षेत्रात हा एक मोठा आयाम गाठला आहे. आंतरराष्ट्रीय को-आॅपरेटीव्ह अलायन्सचे मुख्य कार्यालय हे ब्रुसेल्स येथे असून, उप कार्यालय लंडन आणि न्यूयाॅर्कला आहे.

Advertisement

आर्थिक शिस्त यशाचे गमक: बँकिंग तथा पतसंस्थांच्या क्षेत्रात बुलढाणा अर्बनने: ‘फोर पिलर सिस्टिम’ वापरून 29 वर्षामध्ये हे यश मिळवले आहे. बुलढाणा अर्बनची या सिस्टिममध्ये अर्थकारणातील एक नव संशोधन असल्याचे मत बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डाॅ. सुकेश झंवर यांनी व्यक्त केले. यामुळे आर्थिक व्यवहारात सूसुत्रता येऊन व तो कारणी लागण्यास मदत होऊन संस्थेस आर्थिक बळकटी आली सोबतच ‘आॅल मनी गोज टू द बँक’ हे तत्व तथा सोशल बँकिंगच्या जोरावरा बुलढाणा अर्बनने हे यश मिळवले आहे.

आयसीएत प्रवेश कठीण
आयसीएमध्ये प्रवेश करणे कठीण आहे. यासाठी प्रथम संस्थेची राष्ट्रीय स्तरावर निवड होणे आवश्यक आहे. त्यानंतर जागतिक स्तरावर आयसीएचे सदस्य असलेल्या एखाद्याही संस्थेने नकार दिल्यास आयसीएचे सदस्य होता येत नाही किंवा हे सदस्यत्व संपुष्टात येते. मात्र, बुलढाणा अर्बनला 94 देशातील 274 संस्थांनी विरोध न करता यात सामावून घेतले आहे. त्यामुळे संस्थेचा पुढील काळात या क्षेत्रात दबदबा अधिक वाढणार आहे.

काय होणार फायदे
आयसीएचे (इंटरनॅशनल को-आॅपरेटीव्ह अलायन्स) कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाल्याने सहकार क्षेत्रातील निधीच्या निर्धारणा संदर्भात जागतिक स्तरावर बुलढाणा अर्बनच्या भूमिकेला महत्व प्राप्त् झाले आहे. जागतिक स्तरावर आता पतसंस्थेला मदत करता येईल. राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्राच्या निती निर्धारणात बुलढाणा अर्बनचे मत आवर्जून जाणून घेतले जाईल.

सोशल बँकिंगमध्ये योगदान
लोकांचा पैसा हा लोकांच्याच कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे. जे सोशल बँकिंगचे महत्वाचे तत्व आहे. त्याचा आधार घेत काही प्रमाणात लोकांचा पैसा हा लोकांच्या कल्याणासाठी संस्थेने वापरत जिल्हयात शेतकऱ्यानसाठी गोदाम, विद्याथ्र्यासाठी होस्टेल, रस्ते, ग्रामविकास, उपहारगृह, टेक्सटाईल मिल, दाल मिल अशा सहकारी तत्वावरील उद्योगांची पतसंस्थेने उभारणी करत सकारात्मक अर्थकारणाला हातभार लावला. त्यातून या सोशल बँकिंगची व्याप्ती आता वाढत आहे.

12 हजारांचे रोपटे बनले वटवृक्ष
1986 मध्ये स्वातंत्र्य दिनी अवघ्या 12 हजार रूपयांच्या भांडवलावर बुलढाणा अर्बनचा डोलारा उभा राहिला होता. सध्या बुलढाणा अर्बनकडे साडेचार हजार कोटी रूपयांच्या ठेवी असून, साडेतीन हजार कोटी रूपयांचे कर्ज वाटप पतसंस्थेने केले आहे. महाराष्ट्रासह लगतच्या राज्यात बुलढाणा अर्बनच्या 361 शाखा असून, सहा हजार कर्मचारी या पतसंस्थेत कार्यरत आहेत. त्यामुळे 29 वर्षात बुलढाणा अर्बनच्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

आर्थिक शिस्तीचा परिणाम
आर्थिक शिस्त राखण्यासाठी विकसित करण्यात आलेली फोर पिलर सिस्टीम, सोशल बँकिंग आणि आॅल मनी गोज द बँक या तत्वांचा वापर करत बुलढाणा अर्बनने पतसंस्थांच्या क्षेत्रात यश मिळवले आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय को-आॅपरेटिव्ह अलायन्सचे सदस्यत्व आम्हाला मिळाले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement