बुलढाणा। कारगील युध्द व सियाचिन आतंकवादीविरोधी कारवाईत अतुलनिय कामगीरीबद्दल भारत सरकारने सन्मानित केलेल्या ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन आज बुलडाण्यातील गांधी भवन येथे करण्यात आले होते.नगराध्यक्ष टी डी अंभोरे पाटील यांनी परमवीरचक्र धारकांचा सत्कार केला.याआधी ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांनी हुतात्मा सिध्देश्वर गोरे स्मारकावर व जयस्तंभावर पुष्पचक्र वाहिले.स्मारक परीसरात त्यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
जयस्तंभापासुन सहकार विद्या मंदीराच्या सांस्कृतीक सभागृहापर्यत रस्त्याच्या दुतर्फा शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांचे उर्त्फुत स्वागत केले.बुलेटस्वार युवकांची रॅलीने पाहुने सहकार विद्या मंदिरा पर्यंत पोहचले.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात ऑननरी कॅप्टन बाणासिंग, सुभेदार योगेंद्रसिंग यादव व नायब सुभेदार संजयकुमार यांनी आपले रोमांचक अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर होते.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक संजीवकुमार बाविसकर, मुख्यकार्यपालन अधिकारी दिपा मुधोळ, टी डी अंभोरे, राधेश्याम चांडक मंच्यावर उपस्थित होते. प्रास्ताविक कर्नल सुहास जतकर यांनीकेले.संचलन जिल्हा सैनिक अधिकारी मिलींदकुमार बडगे यांनी केले. कार्यक्रमासाठी बुलडाणॆकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.