Advertisement

नागपूर : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 23 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता उमेदवारांची तयारी, प्रचार आणि राजकीय समीकरणांना वेग येणार आहे.
शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील अधिकृत कार्यक्रमातील इतर तपशीलही लवकरच स्पष्ट होणार आहेत.




