Published On : Thu, Dec 12th, 2019

बसपा महाराष्ट्रात निवडणूका लढविणार नाही : ऍड संदीप ताजने

नागपुर: महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बहुजन समाज पार्टी लढविणार नाही असा निर्णय बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी ह्यांच्या आदेशामुळे बसपा चे प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने (9359595455) ह्यांनी घेतला.

यावेळी महाराष्ट्रातील नागपूर, अकोला, वाशीम, नंदुरबार व धुळे आदी जिल्ह्यात जिल्हा परिषदा, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्या तरी बसपा या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होणार नाही असेही ऍड संदीप ताजने ह्यांनी सांगीतले.