साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त बसपा नेत्यांनी दीक्षाभूमी चौकातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी *”ये आजादी झुठी है, देश की जनता भुखी है”* या अण्णा भाऊंच्या 75 वर्षांपूर्वीच्या (16 आगस्ट 1946) या नाऱ्याचा उल्लेख करत बसपा नेत्यांनी आजही अण्णाभाऊंच्या त्या नाऱ्याची प्रचिती देशातील जनतेला येत असून जैसे थे स्थिती असल्याचे वक्तव्य केले.
अण्णाभाऊंच्या साहित्याच्या शासकीय प्रकाशनावरील अघोषित बंदी उठवून अप्रकाशित व संपलेले साहित्य प्रकाशित करावे व त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. अशी मागणी बसपा नेते उत्तम शेवडे ह्यांनी याप्रसंगी केली.
बसपाचे प्रदेश महासचिव नागोराव जयकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम व माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी, तर कार्यक्रमाचा समारोप जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी केला.
साठे परिवाराला घराचे दान
अण्णाभाऊ हे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावचे त्यांच्या मुलांच्या निधनानंतर अण्णा भाऊंच्या परिवाराची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली. त्यांचे घर राहायच्या लायक नव्हते अशा वेळेस कार्यकर्त्यांनी बसपाच्या माध्यमातून निधी उभा करून एक दुमजली घर बांधून दिले. त्याचे दान बसपा चे राष्ट्रीय अध्यक्ष *मान्यवर कांशीरामजी ह्यांच्या हस्ते 16 मे 2003 ला आजपासून 19 वर्षांपूर्वी अण्णा भाऊंच्या विधवा सुनबाई सावित्रीबाई मधुकर साठे यांच्या स्वाधीन केले* त्या घराचे फलक याप्रसंगी बसपाने प्रदर्शित केले होते ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर व विलास सोमवार, महिला नेत्या सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, माजी जिल्हा सचिव अभिलेश वाहने, नितीन वंजारी, मनोज निकाळजे, युवा नेते सदानंद जामगडे, चंद्रशेखर कांबळे, अड अतुल पाटील, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, विकास नागभिडे, जगदीश गजभिये, सुरेंद्र डोंगरे, गौतम गेडाम, योगेश लांजेवार, सनी मून, सुधाकर सोनपिपळे, बुद्धम राऊत, वीरेंद्र कापसे, प्रवीण पाटील, भानुदास ढोरे, प्रीतम खडतकर, अभय डोंगरे, विलास मून, जितेंद्र पाटील, ऍड विजय वरखडे, स्नेहल उके, संभाजी लोखंडे, संजय इखार, प्रवीण गजभिये, अनिल मेश्राम, स्नेहल उके, सुभाष सुखदेवे, सुनील सोनटक्के, जनार्दन मेंढे, सुभाष सुखदेवे, दर्शन गजभिये, विकास नारायणे, विलास पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.