कामठी -. आगामी होणाऱ्या कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी ने कंबर कसले असून यासाठी बसपाचे पदाधिकारी कामठीच्या 32 वॉर्डामध्ये वस्त्या वस्त्यात जाऊन कमेन्सिंग मीटिंगा लावून नगरपरिषदेचे मागील 15 वर्षाचे कामकाज लोकांना पटवून देत आहेत.
त्यासाठी बैठकीचे आयोजन कांशीराम स्टडी सर्कल कामठी या ठिकाणी करण्यात आले होते. बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या 87 व्या जयंतीच्या दिवशी 15 मार्चला “नगर परिषद अध्यक्ष बनावो” अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. अशी माहिती बसपा कामठी विधानसभेचे अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. त्या अनुषंगाने 32 कोटीच्या गटारी योजनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वर गंभीर गुन्ह्याची नोंद करणे. लाँकडावून च्या दरम्यान सहा महिन्याचे वीज बिल माफ करून व्याजमुक्त विजेचे वितरण करणे .नजूल च्या जागेवर राहत असलेल्या लोकांना पट्टे देणे .
पेट्रोल डिझेल व इतर वास्तू चे भाव त्वरित कमी करणे . अशा विविध मागण्या ला घेऊन 22 मार्च ला एक दिवसीय धरना प्रदर्शन करण्याचा निर्णय बसवा विधानसभा शाखेने घेतला आहे .
बैठकीला राज्याचे महासचिव प्रा. भाऊसाहेब गोंडाणे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम वरिष्ठ बसपा नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब विधान विधानसभा अध्यक्ष इंजि .विक्रांत मेश्राम शहर महिला अध्यक्ष सुनीता रंगारी शहर अध्यक्ष विनय उके विधानसभा उपाध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी चावणी परिषदेचे अध्यक्ष नितीन सहारे रामभाऊ कुर्वे प्रतिभाताताउई नागदेवे अमित भा भैसारे शशीकांत टेंबंकर दिपाली गजभिये विशाल गजभिये असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी










