Published On : Thu, Oct 7th, 2021

बसपा उमेदवार विजयी

नागपुर – नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभेच्या कुही सर्कल मधील तारणा पंचायत समिती मधून बसपा उमेदवार देविदास गवळी (समर्थीत) हे विजयी झाले.

त्यांचे नागपूर जिल्हा बसपा चे अध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश बसपा चे सचिव उत्तम शेवडे, उमरेड विधानसभा चे अध्यक्ष पुणेश्वर मोटघरे, अभय गायकवाड ह्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाऊन त्यांचे तारणा येथे स्वागत केले.

या प्रसंगी उमेदवारांची विजयी रॅली काढण्यात आली त्यात विधान सभेतील शेकडो कार्यकर्ते ढोल ताश्याच्या व डीजेच्या तालावर अनंद व्यक्त करित अनेक गावात फिरले.

उमरेड विधानसभा माजी अध्यक्ष देवानंद उके, नागपूर चे सदानंद जामगडे, विरेंद्र कापसे, उमरेड चे बंडू मेश्राम, राजकुमार लोखंडे, देविदास रामटेके, ऍड दिनेश वंजारी, शुभम खोब्रागडे, करण देशपांडे, प्रेम मेश्राम, गौतम वासनिक, अविनाश सहारे, तुषार वासनिक, मुनिंद्र गेडाम, सुरेश वासनिक, सचिन मेश्राम, दामोदर रामटेके आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.