Advertisement
नागपूर :जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रिपब्लिकन नगर परिसरात गुरुवारी एका तरुणाची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. शैलेश पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन नगरमधील श्रावस्ती बुद्ध विहारजवळ काही हल्लेखोरांनी पाटील याच्यावर हल्ला केला, त्यात तो जागीच ठार झाले. त्यानंतर पाटील यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. गुन्ह्यामागचा हेतू आणि आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपीविरोधात
कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.