Advertisement
मुंबई : भाजप आमदार परिणय फुके यांच्या विरोधात त्यांच्या भावजय प्रिया फुके आक्रमक झाल्या आहेत. याआधीही त्यांनी परिणय फुकेंवर गंभीर आरोप केले होते. आता त्यांनी थेट विधानभवनाबाहेर आंदोलन करत मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली.
सोमवारी, ७ जुलै रोजी प्रिया फुके यांनी विधानभवनासमोर निदर्शने करत “मुख्यमंत्री आम्हाला न्याय द्या” अशी मागणी करत संतप्त भूमिका मांडली. त्यावेळी त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
ही कारवाई होत असताना परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रिया फुके यांनी यापूर्वीही विविध माध्यमांतून फुके यांच्यावर वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर गंभीर आरोप केले असून, आता त्यांनी रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी केल्याने प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.