नागपूर : एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु असून भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे सत्र सुरु झाले आहेत.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत नियोजन व निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.भाजपचे सहसंघटनमंत्री शिवप्रकाश तसेच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.
कोराडी येथील नैवेद्याम नॉर्थ स्टार येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप आयटी सेलचे राष्ट्रीय संयोजक अमित मालवीय प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सोबतच भाजप प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, विधानसभा आणि विधान परिषद सदस्य, भाजपा प्रदेशच्या विविध आघाडी, मोर्चा व प्रकोष्ठ अध्यक्ष तसेच संयोजक प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.