Published On : Tue, Mar 26th, 2019

नागपूर ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण; निशांत अग्रवालला मोठा धक्का

Advertisement

नागपूर : ब्रह्मोस ऐरोस्पेस हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेल्या निशांत अग्रवाल याला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर शाखेत निशांत अग्रवाल इंजिनिअर या पदावर कार्यरत होता.

ब्रह्मोस एरोस्पेस संदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. निशांतला उत्तर प्रदेश एटीएसने नागपूर एटीसच्या मदतीने 8 ऑक्टोबर 2018 रोजी नागपूरच्या घरातून अटक केली होती.

त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता गोपनीय माहिती निशांतच्या कंम्युटरवर मिळाली होती. त्यातून साऱ्या गोष्टींचा खुलासा झाला होता.

निशांतचा खटला नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालणार आहे. दरम्यान, निशांतनं जामीनासाठी नागपूर येथील कोर्टात अर्ज केला होता. उत्तर प्रदेश एटीएसनं निशांतच्या जामीनाला विरोध केला.दरम्यान, खटल्याची पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे.