Published On : Tue, Apr 27th, 2021

दोन्ही ट्रॅव्हल्स धारकास दंडात्मक कारवाई करण्यात आली

Advertisement

पारशिवनी:-तालुवयातिल कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे कन्हान पोलीस स्टेशन समोर व तारसा चौक येथे नाकाबंदी सुरु असतांना दोन ट्रॅव्हल्स थांबवुन प्रवासी तपासले असता मर्यादापेक्षा जास्त प्रवाशी व कोव्हिड संदर्भातील नियमावलीचे उल्लंघन केल्याने दोन्ही ट्रॅव्हल्स धारकास दंडात्मक कारवाई करण्यात आली .

कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासना द्वारे कोरोनाची साकळी तोडण्याकरिता शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरु असुन कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रविवार दिनांक २५ एप्रिल २०२१ ला व सोमवार दिनांक २६ एप्रिल २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन समोर व तारसा चौक येथे नाकाबंदी सुरु असतांना राॅयल ट्रॅव्हल्स क्रमांक एम.१७ पी ११४७ व स्टार ट्रॅव्हल्स क्रमांक युपी ७३ ए ७९२२ अस दोन ट्रॅव्हल्स थांबवुन प्रवासी तपासले असता मर्यादापेक्षा जास्त प्रवाशी व कोव्हिड संदर्भातील नियमावलीचे उल्लंघन केल्याने दोन्ही ट्रॅव्हल्स धारकास प्रत्येकी १०, ००० रुपए दंड असा एकुण दोन्ही ट्रॅव्हल्स वर २०,००० रुपए दंड थोपविण्यात आले असुन या पुढे ट्रॅव्हल्स धारकांनी कोरोना संदर्भातील शासनाच्या नियमावलीचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई या पुढे केली जाईल अशी सक्त ताकीद देण्यात आली .

या कारवाई मध्ये कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर , नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , एपीआई सतिश मेश्राम , ना पो शी राजेंन्द्र गौतम , पो शि शरद गिते , सतीश तांदळे , निसार शेख सह आदि ने ही कारवाई यशस्वि रित्या ने पार पाडली .