Published On : Fri, Jan 17th, 2020

बोरीचा मुली कबड्डी संघाने जिल्हा विजयी झाल्याने गावात जल्लोष

Advertisement

कन्हान : – जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सि.) मुलींचा कबड्डी संघाने पारशि वनी तालुक्याचे नेतुत्व करित जिल्हा विजयी झाल्याने बोरी गावात मुलीच्या कबड्डी चमुची पारितोषकासह विजय प्रभात फेरी काढुन गावक-यांनी विजय जल्लोस थाटात साजरा केला.

जिल्हा परिषद नागपुर शिक्षण विभा गाच्या क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव नुकताच पार पडला. यात वरिष्ट मुली कबड्डी गटात पं स पारशिवनी चे नेतुत्व करण्या-या कन्हान केंद्रातील ग्रामिण भागातील जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिंगोरी) च्या मुली कबड्डी संघाने तिन फे-याच्या संघावर मात करित चौ थ्या फेेरीतील अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला.

तालुक्यातील एकमेव मुली कबड्डी संघ विजय प्राप्त केल्याने पं स पारशिवनीचे गट विकास अधिकारी मा प्रदीपकुमार बम्हनोटे, गटशिक्षणाधिका री मा कैलास लोखंडे, शिक्षण विस्तार अधिकारी मा योगेश ठाकरे, केंद्र प्रमुख अगस्ती मँडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षि कांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. बोरी (सिंगोरी) गावातील गावक-यांनी विजयी जिल्हा मुली कबड्डी संघाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री शांताराम जळते, प्रशि क्षक श्री कडुकर सर, शिक्षक श्री बंड, श्री नंदेश्वर, शिक्षिका अनिता दुबळे, कर्ण धार कु सरिता भोले, खेडाळु कु खुशी राऊत, कु श्वेता कुंभलकर, कु साक्षी वांढ रे, कु तृप्ती येवले, कु साक्षी कुंभलकर, , कु श्रेया येवले हयांनी निकराची झुंज देत जिल्हा स्तरिय विजय प्राप्त करून गाव, तालुक्याचे नावलौकिक केल्याबद्दल संपुर्ण संघाचे अभिनंदन करून गावात प्रभात फेरी काढुन विजय जल्लोष साजरा करून शाळेच्या विजयी संघाचा उत्साह व्दिगुणीत केला.