Published On : Mon, Jun 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गोरेवाडा प्राणी उद्यानात बिबट्यांची रक्तरंजित झडप; एका बिबट्याचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Advertisement

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात रविवारी दोन बिबट्यांमध्ये झालेल्या भीषण संघर्षात एका बिबट्याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे प्राणी उद्यानाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियमित पाहणीदरम्यान कर्मचाऱ्यांना दोन बिबटे एकमेकांवर जीवघेणा हल्ला करताना आढळले. हा संघर्ष इतका तीव्र होता की एका बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमी बिबट्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वन विभाग आणि प्राणी उद्यान प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जंगलातील एखादा बाहेरील नर बिबट्या सफारी क्षेत्रात शिरला असावा. त्यानंतर क्षेत्रीय वर्चस्वाच्या कारणावरून दोन्ही बिबट्यांमध्ये संघर्ष झाला असावा. या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, गोरेवाडा प्राणी उद्यानात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी बाहेरून आलेल्या बिबट्याने सफारीतील बिबट्याला ठार केल्याची घटना समोर आली होती. तसेच एका घटनेत जंगलातील बिबट्या शाकाहारी प्राण्यांच्या सफारीत घुसून अनेक हरणांची शिकार केल्याचेही समोर आले होते.

Advertisement

गोरेवाडा प्राणी उद्यानात बिबट्या, वाघ, अस्वल आणि शाकाहारी प्राण्यांसाठी स्वतंत्र सफारी क्षेत्रे असून त्यांच्यामध्ये मजबूत कुंपण आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या घुसखोरीच्या घटनांमुळे या व्यवस्थेच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली असून ड्रोनच्या मदतीने बाहेरील बिबट्या नेमका कोणत्या मार्गाने सफारी क्षेत्रात दाखल झाला, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, वन्यजीव तज्ज्ञांनी जंगल आणि सफारी क्षेत्रादरम्यानची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे गोरेवाडा प्राणी उद्यानातील वन्यजीवांच्या सुरक्षेसह पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.