Published On : Thu, May 13th, 2021

प्रभाग २६ मध्ये प्लाझ्मा दानाकरिता रक्त तपासणी शिबिर

Advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त ऍड. धर्मपाल मेश्राम यांचे आयोजन

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपा प्रदेश सचिव तथा प्रभाग २६ चे नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या वतीने प्रभाग २६ मध्ये प्लाझ्मा दानाकरिता रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रामुख्याने भेट दिली.

सध्याच्या कोरोनाच्या संकटात गरजू रुग्णाला वेळेवर प्लाझ्माचा उपचार मिळावा व त्या माध्यमातून त्याचे प्राण वाचविता यावे यासाठी आज प्लाझ्मा दानाची गरज आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी आपण प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहोत अथवा नाही यासाठी रक्त तपासणी आवश्यक आहे. रक्त तपासणी करून प्लाझा दानासाठी पात्र ठरल्यास केव्हाही प्लाझ्मा दान करणे सोयीचे ठरू शकते. या हेतूने प्रभाग २६ मध्ये ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्यामार्फत प्लाझ्मा दानासाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रामुख्याने भेट दिली. यावेळी प्रा. प्रमोद पेंडके, संजय अवचट , प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, सुरेश बारई, कमलेश नागपाल, सुनील आगारे उपस्थित होते.

रक्त तपासणी शिबिरासाठी विलास कुराडे, राजू गोतमारे, दिपक पाटील, ज्योती वाघमारे, गायत्री उचितकर, जेठू पुरोहित, रवी धांडे, सुरेश उदापूरकर, मधुकर बारई, कपील बावणे, अनंता शास्त्रकार, कविता हत्तीमारे, किशोर सायगन, विक्रम डुंबरे आदींनी परिश्रम घेतले.