नागपूर – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने बुधवारी नागपुरात रक्तदान आंदोलन केलं. हे आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ करण्यात आलं.
यावेळी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी फडणवीस यांना सातबारा कोरा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री खरे रामभक्त असतील तर ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील.”
कडूंनी इशारा दिला की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ३ जूनला अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यानंतर राज्यातील सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानांसमोर देखील आंदोलन करण्यात येईल.
तरी देखील मागण्या मान्य न झाल्यास ते ७ जूनपासून अकोल्यातील मोझरी येथे उपोषणाला बसणार आहेत.प्रहारच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.