Published On : Tue, Sep 10th, 2019

आजनी येथे ५३ रक्तदात्यांचे रक्तदान

कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षोसुद्धा तालुक्यातील आजनी येथे गणपती उत्सवा निमित्त नवयुवक युवा मंडळ, जनजागृत गणेशोत्सव मंडळ, श्री ची इच्छा समिती, वीर शिवाजी मंडळ, जीवन तरंग परिवार, जय बजरंग क्रीडा मंडळ, वीर बजरंग क्रीडा मंडळ आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेच्या संयुक्त माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलन लाईफ लाईन रक्तपेढीने केले.

या प्रसंगी सरपंच सुनीलजी मेश्राम, उपसरपंच उमेशजी रडके,ज्ञानेश्वरजी वांढरे, घोडे गुरुजी, बोंबाटे साहेब,घनश्यामजी चकोले,संजयजी महल्ले, आपदा पायी वारीचे कार्यकर्ते, गजेंद्र वाठ,अरुण भिवगडे,विनायकजी रोकडे,धर्मराज हेटे ,राहुल शेळके यांची विशेष उपस्थिती होती.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी बादल बोंबाटे, अमित सुमित भोयर, मोहित वाट, कार्तिक दवंडे, रोशन दवंडे, राहुल ढोक, निखील विघे,नामदेव दवंडे, वैभव लोहकरे, अमर वानखेडे,अमोल हेटे,शुभम वाणी, आशिष सोनेकर,सुरेंद्र विघे, अमोल गजभिये, मंगेश रामटेके, राजकुमार दवंडे, विकी घोडे, लीलाधर दवंडे,शिवपाल वाटकर,ऋतिक उके,अश्विन खंडाते, कृष्णा ठाकरे,मपीत कोठाडे आदीसह सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहाय्य केले. याकार्यक्रमास ग्राम पंचायत आजनी, आपदा पायी वारी ट्रस्ट, मानवधर्म परिवार यांचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचा हे सलग सहावा रक्तदान शिबीर होते हे विशेष.

संदीप कांबळे कामठी