सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती असल्याने अनेक रुग्णांना रक्ताची व प्लाझ्माची आवश्यकता पडत आहे त्यासाठी भाजप वैद्यकीय आघाडी व डॉ हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमानेव डॉ श्रीरंग वराडपांडे यांचे द्वारा गजानन महाराज श्रद्धास्थान, रेशीमबाग येथे रक्तदान – प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
या शिबिराचे उदघाटन राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे महापौर दयशंकरजी तिवारी, हेडगेवार रक्तपेढीचे संचालक डॉ अशोकजी पत्की सर, गजानन महाराज श्रध्दास्थानचे संयोजक श्री गिरीश वराडपांडे, नगरसेवक डॉ रवींद्र भोयर, दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री देवेन्द्रजी दस्तुरे , वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे,महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ ज्ञानेश ढाकुलकर, डॉ संजय अवचट, डॉ हरीश राजगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात कोविड रुग्णांसाठी आपण युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान प्लाझ्मादान कराव आणि भाजप वैद्यकीय आघाडीच्या उपक्रमाचे कौतुक करून नागपूरकरांसाठी अधिक रक्तपुरवठा संकलित व्हावा असं आव्हाहन महापौर दयशंकरजी तिवारी यांनी केलं तर लसीकरण हेच कोविड लढाईतील यशस्वी ब्रह्मास्त्र आहे आपण लस घ्यावी अशी विनंती खासदार विकासजी महात्मे यांनी केली.
या शिबिरात 18-55 वयोगटातील युवक युवतीनी सहभाग नोंदविला व या वाईट परिस्थितीमध्ये नागपूरकरांच्या मदतीसाठी आम्ही उपलब्ध असू असं आश्वासन दिलं.