Published On : Mon, Jan 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात धान्याचा काळा बाजार, आरोपीच्या घरावार छापा; लाखोंचा माल जप्त

Advertisement

नागपूर: शहरातील रेशन धान्याचा काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाही. उत्तर नागपुरातील यशोधरा नगर परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका आरोपीच्या घरावर छापा टाकून सुमारे 12 टन रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी (Nagpur Police) ३ आरोपींना अटक केली, तर 3 आरोपी फरार झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तांदूळ आणि रेशनच्या धान्याचा ट्रक असा 14 लाख 30 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून यामध्ये तांदळाची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे. यशोदा नगर येथील वनदेवी नगर रेल्वे क्रॉसिंगजवळील एका घरात रेशनच्या धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा पोलीस विभागाच्या युनिट 5 ला शनिवारी मिळाली. (Nagpur Crime News In Marathi)

या व्यवसायात अनेक आरोपींचा सहभाग असून काही दिवसांपूर्वीच हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. माहितीच्या आधारे युनिट-5 च्या पथकाने आरोपी इर्शाद शेख याच्या घरावर छापा टाकून सुमारे 12 टन तांदूळ जप्त केला. हे साहित्य रेशनच्या धान्याचे सांगितले जात आहे. आरोपी इर्शाद शेख जुम्मन शेख, तेहसीन अन्सारी मोहम्मद यासीन, वाहिद अन्सारी यासीन अन्सारी यांना अटक केली. आकिब मलिक रायलुद्दीन मलिक, हसीन अहमद फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 3 मोबाईल फोन, 12 टन तांदूळ, ट्रक (क्र. एम. एच. 40. बी. जी. 8540) जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.