Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 18th, 2017

  कन्हान-पिपरी नगरपरिषदेत भाजपाचे शंकर चंहादे नगराध्यक्ष व मनोहर पाठक उपाध्यक्ष


  कन्हान: नव्याने झालेल्या कन्हान -पिपरी नगरपरिषदेतील अडीच वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाल्यावर आज झालेल्या निवडणुकीत भाजपाचे शंकर चंहादे नगराध्यक्ष व मनोहर पाठक उपाध्यक्ष म्हणून ११/५ मतानी निवडुन आले.

  नगरपरिषद कन्हान -पिपरी ची नगराध्यक्ष व उपाध्यक्ष प़दाची निवडणुक आज १८ ऑगस्ट्र २०१७ ला नगरपरिषद कार्यालयात सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी रामटेक राम जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .यात नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाचे शंकर चंहादे, अनिता पाटील आणि कॉग्रेस व शिवसेना व्दारे नरेश बर्वे हयानी नामाकंन भरले होते. भाजपाचे शंकर चंहादे यांना ११मते तर शिवसेना व कॉग्रेसचे नरेश बर्वे यांना ५ मते मिळाली असून भाजपाच्या अनिता पाटील तटस्थ राहिल्याने त्याना ० मते असल्याने भाजपाचे शंकर चंहादे ११/५ नी विजयी झाले. उपाध्यक्ष पदाकरिता भाजपाचे मनोहर पाठक यांना ११मते तर कॉंग्रेस व शिवसेनेच्या करूणाताई आष्टणकर यांना ५ मते मिळाल्याने भाजपाचे मनोहर पाठक ११/५ ने विजयी झाले.

  कन्हान -पिपरी ग्राम पचायतीचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाल्यावर निवडणुक घेण्यात आली होती. यात भाजपाचे ११ नगरसेवक निवडुन आले होते. यात शंकर चंहादे, मनोहर पाठक, मनोज कुरडकर, अजय लोंढे, सुषमा चोपकर, अनिता पाटील, लक्ष्मीताई लाडेकर, संगिता खोब्रागडे, आशा पनिकर, नितु गजभिये, राखी परते, शिवसेना चे गणेश भोंगाडे, करूणाताई आष्टणकर, वैशाली डोणेकर, कॉंग्रेस चे नरेश बर्वे, राजेश यादव तर अपक्ष म्हणून गेंदलाल काठोके असे एकुण १७ नगरसेवक कन्हान शहरातील मतदात्यांनी शहरांच्या विकासाकरिता निवडुन दिले होते. परंतु नगराध्यक्षा आशा पनीकर च्या कार्यकाळात सतापक्ष व विरोधी पक्षाच्या कार्याने मतदाता असंतुष्ट झाल्याने नवे नगराध्यक्ष शंकर चंहादे कन्हान-पिपरी च्या शहरवासीयांना खरच आपल्या कुशल कार्यपध्दतीने सर्वसामान्य नागरिकांना दैनदिनी सुविधा व्यवस्थित देऊन स्वच्छ प्रशासन राबवुन न्याय देतील का? याकडे सुञ शहरवासी आतुरतेने अपेक्षा करित आहे.नगरपरिषद कन्हान-पिपरीचे पहिलेच पुरूष नगराध्यक्ष म्हणून नावलौकिक मिळवतील का? याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145