Published On : Fri, Nov 22nd, 2019

संदीप जोशी नागपूरचे महापौर, सेनेचा निवडणुकीवर बहिष्कार

Advertisement

नागपूर: भाजपचे संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर झाले. महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांना 104 मते मिळाली. राज्यात भाजपशी संबंध तोडल्यानंतर शिवसेनेच्या येथील नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना 26 तर बसपाच्या मोहम्मद इब्राहिम यांना 10 मते मिळाली.

महापौरपदासाठि आज महाल येथील नगरभवनमध्ये पार पडली. सुरुवातीला उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली. उमेदवारी मागे न घेतल्याने भाजप, कॉंग्रेस व बसपा उमेदवारांत निवडणूक झाली. भाजपचे 108 सदस्य होते. यापैकी जगदीश ग्वालवण्शी यांचे निधन झाले. सतीश होले यांना भाजपने निलंबित केले आहे तर दुर्गा हत्तिठेले यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. मनपातिल भाजपचे उपनेते बाल्या बोरकर यांची अनुपस्थिती मात्र सगळ्याच्या चर्चेचा विषय ठरली. हात उंचावून मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. जोशी यांना 104 मतांसह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विजयी घोषित केले. उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा कोठे यांना विजयी घोषित करण्यात आले. कोठे यांना 104 तर राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांना 26, बसपाच्या मंगला लाण्जेवार यांना 10 मते मिळाली. या निवडणुकीपासून शिवसेना नगरसेवकांनी स्वतःला दूर ठेवले. नगरसेवक किशोर कुमेरीया व नगरसेविका मंगला गवरे अनुपस्थित होत्या. कॉंग्रेसचे चार नगरसेवक अनुपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement