Published On : Sat, Aug 1st, 2020

दुधाच्या भावाढीसाठी कामठी तालुक्यात भाजप चे दूध आंदोलन

कामठी :-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी च्या वतीने शेतकरी व दुध उत्पादक शेतकरी संकटात असून त्यांना योग्य भाव दिला जात नाही .अक्षरशा त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे .

दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला मिळत असतानाही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देण्यात आला नाही त्यामुळे दुधाला प्रति लिटर 10 रुपये ज्यादा भाव देण्यात यावा ,दूध भूकटीला 50 रुपये अनुदान मिळावे आदी मागण्यासाठी भाजप तर्फे संपूर्ण राज्यात ठिकठिकानी आंदोलन उभारले असून या पाश्वरभूमीवर आज भाजप महाराष्ट्र प्रदेश महासचिव व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात कामठी तालुक्यातील आजनी गावातील दूध संकलन केंद्रासमोर दूध आंदोलन करण्यात आले.तर याप्रसंगी हे दूध आंदोलन शेतकऱ्यांच्या हितार्थ व दुध उत्पादकांच्या न्यायिक हक्कांसाठी असल्याने आजनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी आमदार देवराव रडके यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग दर्शविला होता हे इथं विशेष!

याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, ,जिल्हा परिषद चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, कामठी पंचायत समितीचे सभापतो उमेश रडके,महादूला नगर पंचायत चे अध्यक्ष राजेश रंगारी, जिल्हा परोषद सदस्य मोहन माकडे, माजी सरपंच मनीष कारेमोरे, किशोर बेले, ऍड आशिष वंजारी, कीरण राऊत, प्रीतम लोहासारवा ,हर्षल हिंगणेकर, प्रमोद शेंडे, कुणाल कडू, सुनील तडस, चुडामन बेलेकर, मंगेश गचुळे ,प्रमोद वर्णम, पंकज वर्मा, राजा यादव, सतीश जैस्वाल आदी उपस्थित होते.


संदीप कांबळे कामठी