Published On : Mon, Jul 26th, 2021

प्रभाग २६ची भाजपा महिला वार्ड कार्यकारीणी जाहीर

नागपूर : भारतीय जनता पार्टीची प्रभाग २६ महिला कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. प्रभाग २६ महिला वार्ड अध्यक्षा सिंधुताई पराते यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, भाजपा प्रदेश सचिव तथा प्रभाग २६चे नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम, मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष निशाताई भोयर, महामंत्री श्रीमती फुलझले, मंडळ वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॅा हरीश राजगिरे, प्रभाग २६चे वार्ड अध्यक्ष अशोक देशमुख, राजेश संगेवार, चंद्रशेखर पिल्ले, मंडळ कार्यालय प्रमुख सुधीर दुबे, उत्तर भारतीय मोर्चा महामंत्री जेठुजी पुरोहित, वार्ड महामंत्री खुशाल वेडेकर, वार्ड संपर्क प्रमुख राम सामंत, शीला वासमवार आदी उपस्थित होते.

कार्यकारीणीमध्ये निवड झालेल्या सर्व महिला पदाधिका-यांचे यावेळी आमदार कृष्णा खोपडे व प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी अभिनंदन केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व महिला पदाधिका-यांनी रणनीती आखून त्याद्वारे पूर्ण ताकदीने काम करण्याची सूचना यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

तर महिलांनी स्वत:ला व परिवाराला सक्षम करत पक्षकार्यासाठी झोकून देउन काम करण्याचे आवाहन ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.