Published On : Fri, Apr 21st, 2017

चंद्रपूरमध्ये भाजपला ‘पुरेपूर’ बहुमत

Advertisement

Chandarpur: चंद्रपूर महानगरपालिकेत आता भाजप ‘स्वबळावर’ आपला महापौर बसवू शकणार आहे. चंद्रपूरमधील ६६ जागांपैकी ५३ जागांचे कल पाहता, भाजप ३१ जागांसह बहुमताकडे वाटचाल करताना दिसतोय. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं वजन वाढणार आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. २६ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, तर भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या.

परंतु, काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाचा भाजपला फायदा झाला होता. काँग्रेस नेते रामू तिवारी यांच्या गटातील १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं महापौरपद त्यांना मिळालं होतं. पण यावेळी भाजप स्पष्ट बहुमत मिळवून चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन करू शकतो

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement