Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपाची देशव्यापी ‘तिरंगा रॅली’; ९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान!

मुंबईत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली
Advertisement

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ९ ते १७ ऑगस्टदरम्यान देशभरात ‘तिरंगा रॅली’ अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. या अभियानाचा प्रमुख कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी मुंबईत होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन युवा कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणार आहेत. या रॅलीत मुंबई आणि परिसरातील सुमारे २० ते २५ हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

भाजपाने युवकांना राष्ट्रभक्तीच्या भावनेशी जोडत पक्षाच्या संघटनात्मक कार्यात अधिक सक्रिय करण्यासाठी या अभियानाची आखणी केली आहे. मुंबईसह पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ ते १७ ऑगस्टदरम्यान तिरंगा रॅली आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक पदाधिकारी आपल्या-आपल्या जिल्ह्यांतील रॅलीत सहभागी होणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, मित्रपक्ष आणि समविचारी संघटनांनाही मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अलीकडेच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शैक्षणिक प्रश्नांवरून देशभरातील युवकांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर युवकांशी पुन्हा संवाद साधत त्यांना पक्षाशी जोडण्याच्या उद्देशाने भाजपाने ‘तिरंगा रॅली’चे नियोजन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, या संदर्भात भाजपाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. पक्षाच्या मते, स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात देशभक्तीचा संदेश देत युवकांना एकत्र आणणे आणि संघटना अधिक बळकट करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.