Advertisement
मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पाहिजे ती खती न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
गृह, नगरविकासह महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार नसल्याने नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेऊन चर्चा केली.
पहिल्या टप्प्यात २५-२८ मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत बुधवारी रात्री भेट घेऊन चर्चा केल्याने
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.