Published On : Tue, Sep 18th, 2018

भाजपा पदाधिकारी मेळाव्यात शंभर महिलांचा भाजपात प्रवेश

नागपूर: भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या त्यागातून उभा राहिलेला पक्ष असून आज जगातील सर्वात मोठी सदस्य संखृया असलेला पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या देशाचा आणि राज्याचा विकास होत आहे.

सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन लाभत असून शासनाच्या योजना आणि वरिष्ठ नेत्यांनी केलेले विकास कार्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Advertisement

नवी कामठीतील एमटीडीसी सभागृहात नुकताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात पालकमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी न.प. सदस्या संध्या रायबोले यांच्या नेतृत्वात शंभर महिलांनी पालकमंत्र्यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश घेतला. कामठी शहर क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा पदाधिकारी मनोज चवरे, नरेश मोटघरे, डॉ. संदीप कश्यप, विवेक मंगतानी, कमल यादव, अशोक झाडे, राजेश खंडेलवाल, श्रीकांत शेंद्रे, नगरसेवक लालसिंग यादव, धर्मपाल मानवटकर, प्रतीक पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद चवडे, रुपेश भूतांगे, प्रवीक बोंबले, अक्षय ठवरे, अजित सोनकुसरे, शैलेश रामटेके, संदीप भालेराव, सुरेश गजभिये, हर्षद अढाऊ, चंदा तुरस्कर, प्रभा राऊत, रंजना कश्यप, राजा देशमुख, पृथ्वीराज दहाट, रमेश वैद्य, आनंद बिसी, सुनील वक्कलवार, मोंटू जनबंधू, पंकज गजभिये, सतीश जयस्वाल, अजय पंचोली यांनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement