Published On : Mon, May 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

भाजप नागपूर महानगरचा दोन दिवसीय प्रशिक्षणवर्ग’ सुरू; १५० प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती;१२ वैचारिक सत्रे; १५० निमंत्रित पदाधिकाऱ्यांचा सहभाग

नागपूर:भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरच्या वतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६’ अंतर्गत दोन दिवसीय निवासी महानगर प्रशिक्षण वर्गाची सुरुवात आज, ९ मे पासून वर्धा रोड येथील ॲम्ब्रोशिया फार्म येथे झाली.भारतीय जनता पक्ष महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व भारतमातेचे पूजन करून प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र जी कोठेकर,आमदार परिणय फुके,खासदार मायाताई ईवनाते, भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी,प्रदेश उपाध्यक्ष संजयजी भेंडे,माजी आमदार गिरीश जी व्यास,माजी आमदार अनिलजी सोले,माजी आमदार डॉ मिलिंद माने,प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम,उप महापौर लीना ताई हातीबेड,सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर,श्रीकांत जी देशपांडे,अशोक जी मेंढे इत्यादी मंचावर उपस्थित होते,यावेळी प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक परिणय फुके यांनी मांडले,चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र व राज्य सरकार योजनांची कामगिरी या विषयावर सत्र घेऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण अभियानांतर्गत यापूर्वी विधान सभा निहाय व मंडळ स्तरावर निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

Gold Rate
May 09- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,200 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,58,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आता महानगर स्तरावरील या दोन दिवसीय निवासी वर्गामध्ये एकूण १२ सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये विविध अनुभवी वक्ते कार्यकर्त्यांना संघटन कौशल्य, सरकारी योजनांची माहिती, कार्यपद्धती,बूथ व्यवस्थापन, कार्यकर्ता विकास, देशासमोरील आव्हान,सोशल मीडिया वापर व एआय,वैचारिक अधिष्ठानावर व इतर विषयांवर मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे स्वतः विविध विषयांवर सत्र घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गासाठी संपूर्ण नागपूर महानगरातून सुमारे १५० प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

दोन दिवसांच्या या कालावधीत विविध विषयांवर सखोल चिंतन करून भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि उद्दिष्टे सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे कशी पोहोचवता येतील,याची रणनीती आखली जाणार आहे.प्रशिक्षण वर्गाचे संचलन प्रशिक्षण वर्ग प्रमुख संदीप जाधव यांनी केले.​या प्रशिक्षण वर्गाबाबत माहिती देताना शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी म्हणाले की,”भाजप हा संघटन आधारित पक्ष आहे,संघटन हे कार्यकर्ता आधारित आहे तर हा कार्यकर्ता नीती आधारित आहे.कार्यकर्त्या मुळे संघटन तर संघटन मुळे पक्ष मजबूत होतो” भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची विचारधारा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे तत्वज्ञान आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे,हा या वर्गाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement