Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 1st, 2019

  भाजपाचा सांस्कृतिक आघाडी मेळावा

  नागपूर नागपुरात सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कलावंतांना प्रोत्साहन देण्याची गरज होती, ती नितीन गडकरी यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण केली. त्यामुळे कलावंतावर प्रेम करणाऱ्या नेत्याच्या मागे आगामी निवडणुकीत उभे राहण्याची गरज असल्याचे मत सूरमणी प्रभाकर धाकडे यांनी केले.

  नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपा-सेना युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ आज सिव्हिल लाईन येथील जवाहर वसतीगृहात सांस्कृतिक आघाडीतर्फे कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे राजेश बागडी, प्रा. संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता, ज्येष्ठ कलावंत शक्तिरतन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी मागील दोन वर्षात सांस्कृतिक महोत्सव तसेच खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून काम केले. कलावंतांना आपल्या क्षेत्रात कायम संघर्ष करावा लागतो. आगामी काळात कलावंताना येणाऱ्या समस्यांविषयी काम करणार असून त्याचसोबत नव्या पीढीतील कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे काम करण्याची गरज असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. येत्या काळात अंबाझरी येथे ओपन एअर थिएटर साकारण्याचा मानसही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी विनोद इंदूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

  उत्तर नागपूर सर्वसोयीयुक्त करणार

  उत्तर नागपुरातील कळमना, शांतीनगर, विनोबा भावेनगर भागात सर्वसोयीयुक्त विकासासह, गरीब मुलांच्या हाताला काम देण्याचे ध्येय असल्याचे गडकरी यांनी त्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील कळमना येथे आयोजित जाहीर सभेत सांगितले. भगवान गौतम बुद्ध यांच्याशी निगडीत असलेली स्थळे जोडणाऱ्या ‘बुद्धिस्ट सर्किट’चे काम असून देशासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरून लोक बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतील, असे गडकरी म्हणाले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145