Published On : Mon, Mar 8th, 2021

भाजप वैद्यकीय आघाडी द्वारा डॉ रोहिणी पाटील, डॉ रंजना व्याघ्रळकर यांना आरोग्य मातृशक्ती पुरस्कार प्रदान

भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर शहर द्वारा महिलादिनाचे निमित्याने सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ रोजी नागपुरातील सामाजिक व आरोग्य क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान दिलं अशा मातृशक्तींना *आरोग्य मातृशक्ती पुरस्कार* देऊन गौरवान्वित करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रकट समारंभ करणे शक्य होणार नसल्यामुळे भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर शहर द्वारा या डॉक्टर्स ना त्याच्या क्लिनिक मध्ये जाऊन शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, देऊन सन्मानीत करण्यात आलं, यातविशेषतः ब्रेस्ट कैन्सर च्या रुग्णाच्या अंतिम श्वासापर्यंत मदत मिळावी या सद्हेतूने कार्यरत असलेल्या डॉ रोहिणीताई पाटील, तसंच आयुर्वेद क्षेत्रात लोकोपयोगी व बहुमूल्य योगदान असणाऱ्या व्याघ्रळकर आयुर्वेद रिसर्च फौंडेशन च्या संचालिका आयुर्वेद तज्ञ डॉ रंजनाताई व्याघ्रळकर, सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ विद्याताई इंगोले, वनिताताई तिरपुडे, बालरोग तज्ञ डॉ विद्याताई इंगोले, नलिनीताई ठक्कर या मातृशक्तीना आघाडी शहर अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष डॉ प्रीती मानमोडे, यांचे हस्ते डॉ ज्ञानेश ढाकुलकर, डॉ श्रीरंग वराडपांडे, विशाल मानापुरे, डॉ ललित जैन, दक्षिण पश्चिम युवा मोर्चा अध्यक्ष यश सातपुते आणि नागपूर समस्त पदाधिकारी वैद्यकीय आघाडी तर्फे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचं संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केलं…